पुणे – गेल्या तीन चार दिवसांपूर्वी पाच हजारांपर्यंत आलेली बाधितांची संख्या आता पुन्हा एकदा सहा हजारांच्या आसपास पोहोचली असून, गेल्या 24 तासांत 6 हजार 434 नव्या बाधितांची नोंद करण्यात आली आहे. तसेच 73 जणांचा मृत्यू झाला असून, त्यातील 20 बाधित पुण्याबाहेरील आहेत.
बाधितांची संख्या पुन्हा वाढण्याला सुरूवात झाली आहे. परंतु त्या तुलनेत डिस्चार्ज दिलेल्यांची संख्याही वाढत आहे. दिवसभरात 4 हजार 712 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आता एकूण बाधितांची संख्या 3 लाख 67 हजार 237 झाली आहे, तर बरे झालेल्यांची संख्या 3 लाख 4 हजार 492 झाली आहे. बाधितांमधील 56 हजार 636 सक्रीय असून, त्यातील 1 हजार 250 बाधितांची प्रकृती गंभीर आहे, तर 5 हजार 870 रुग्णांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे.
दिवसभरात शहरात झालेल्या 53 मृतांसह आता एकूण मृतांची संख्या 6 हजार 109 झाली आहे. तर गेल्या चोवीस तासांत 24 हजार 72 संशयितांची स्वॅब टेस्ट करण्यात आली आहे.