Pune Corona Updates | दिवसभरात 5395 नवे बाधित; 49 जणांचा मृत्यू

पुणे – दिवसभरात 5 हजार 395 करोना बाधितांची नव्याने नोंद झाली. त्यांचा समावेश करून आता बाधितांची संख्या 3 लाख 44 हजार 924 झाली आहे. गेल्या 24 तासांत 4 हजार 321 जणांना डिस्चार्ज दिला असून, आजपर्यंत 2 लाख 89 हजार 122 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

बाधितांमधील ऍक्‍टिव्ह रुग्ण 54 हजार 351 असून, त्यातील 1 हजार 172 बाधितांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे तर 5 हजार 478 बाधित ऑक्‍सिजनवर आहेत. एकूण 5 हजार 951 जणांचा मृत्यू झाला असून, त्यात गेल्या 24 तासांतील 49 जणांचा समावेश आहे.

या शिवाय आणखी 19 जणांचा मृत्यू झाला असून ते पुण्याबाहेरील आहेत. आजपर्यंत 18 लाख 8 हजार 593 संशयितांची स्वॅबटेस्ट झाली असून दिवसभरात 21 हजार 922 संशयितांची स्वॅबटेस्ट करण्यात आली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.