पुणे – दिवसभरात 2,342 करोना बाधितांची नोंद झाली असून, 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे; यातील दोन जग्ण पुण्याबाहेरील आहेत. आजपर्यंत बाधितांची संख्या 2 लाख 37 हजार 736 झाली आहे.
दरम्यान, गेल्या 24 तासांत घरी सोडलेल्या 1 हजार 789 जणांचा समावेश करून आजपर्यंत 2 लाख 9 हजार 606 जण बरे झाले आहेत. सोमवारी मृत पावलेल्या 15 जणांचा समावेश करून एकूण बाधित मृतांची संख्या 5 हजार 68 झाली आहे.
बाधितांमधील ऍक्टीव्ह रुग्णसंख्या 23 हजार 62 असून, त्यातील 524 रुग्णांची प्रकृती गंभीर आहे, तर 958 जण ऑक्सिजनवर आहेत.
दिवसभरात खासगी लॅब आणि महापालिकेच्या स्वॅब कलेक्शन सेंटर यांच्याकडे मिळून 11 हजार 890 संशयितांच्या टेस्ट करण्यात आल्या आहेत.