पुणे –शहरात मागील चोवीस तासांत 119 करोना बाधित आढळले असून, बरे झालेल्या 236 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. याशिवाय पुण्यातील तीन रुग्णांसह 7 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
शहरातील सक्रीय बाधितांची संख्या 2 हजार 86 पर्यंत कमी झाली आहे. यापैकी 199 रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 4 लाख 89 हजार 21 जणांना करोनाची लागण झाली असून, त्यापैकी 4 लाख 78 हजार 119 रुग्ण बरे झाले आहेत. तर 8 हजार 816 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान मागील चोवीस तासांत 6 हजार 313 संशयितांची स्वॅब टेस्ट करण्यात आली आहे.