पुणे –दिवसभरात 237 जण करोना बाधित आढळले असून, 10 बाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यातील तीन जण पुण्याबाहेरील आहेत.
आजपर्यंत 29 लाख 559 संशयितांची टेस्ट करण्यात आली. त्यातील 4 लाख 87 हजार 800 जण बाधित आढळले. उपचारांती 4 लाख 76 हजार 659 जण बरे झाले. मात्र बाधितांमधील 8 हजार 786 जणांचा मृत्यू झाला. त्यात गेल्या 24 तासांतील 7 जणांचा समावेश आहे.
सद्यस्थितीत बाधितांमधील 2 हजार 355 जण सक्रीय बाधित असून, त्यातील 216 जणांची प्रकृती गंभीर आहे. तर 351 जण ऑक्सिजनवर आहेत. गेल्या 24 तासांत 181 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.