पुणे – शहरात मागील चोवीस तासांत 142 करोना पॉझिटिव्ह आढळले असून, बरे झालेल्या 243 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर पुण्यातील 5 रुग्णांसह 7 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
शहरातील सक्रीय बाधितसंख्या 2 हजार 306 पर्यंत कमी झाली आहे. यापैकी 218 रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. शहरात आतापर्यंत 4 लाख 87 हजार 563 जणांना करोनाची लागण झाली असून, त्यापैकी 4 लाख 76 हजार 478 रुग्ण बरे झाले आहेत. तर 8 हजार 779 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान मागील चोवीस तासांत 7 हजार 200 संशयितांची करोना टेस्ट करण्यात आली आहे.