पुणे : करोना पॉझिटिव्हिटी रेट 16.57 टक्क्यांवर

पुणे – करोना बाधितांचा मार्च आणि एप्रिलमध्ये वाढलेला पॉझिटिव्हिटी रेट आता कमी झाला असून, सध्या तो 16 टक्क्यांच्या आसपास आहे. सुमारे 30 टक्क्यांपर्यंत गेलेला पॉझिटिव्हिटी रेट जवळपास निम्म्यावर आला आहे.

मार्च, एप्रिल महिन्यात बाधितांचा पॉझिटिव्हिटी दर हा सुमारे 30 टक्क्यांपर्यंत गेला होता. तसेच दोन महिने तो सातत्याने 25 ते 30 टक्क्यांमध्येच होता. मात्र, एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून बाधितांची संख्या कमी होण्याला सुरुवात झाली आणि हा पॉझिटिव्हिटी दरही कमी होण्याला सुरुवात झाली.

अर्थात मार्च आणि एप्रिलमध्ये संशयितांच्या तपासण्याही सुमारे 20 ते 25 हजारांपर्यंत गेल्या होत्या. त्यातूनही बाधितांची संख्या ही 30 टक्क्यांपर्यंत होती. मात्र, आता संशयितांची तपासणी सुमारे दहा हजाराने कमी झाली असली तरी बाधितांची संख्याही कमी होताना दिसत आहे. सध्या ती दोन ते अडीच हजारांच्या आसपास आहे.

27 एप्रिलदरम्यान बाधितांचा पॉझिटिव्हिटी दर 23.24 टक्के होता. त्यानंतरही तो 23 आणि 21 टक्क्यांच्याच दरम्यान राहिला. तीन ते चार मेनंतर बाधितांचा पॉझिटिव्हिटी दर कमी होण्याला सुरुवात झाली आणि तो 20 पेक्षा कमी म्हणजे 19, 18 असा येण्याला सुरुवात झाली. आठ मे रोजी पॉझिटिव्हिटी दर 16.57 इतका नोंदवला आहे.

गेल्या 15 दिवसांतील पॉझिटिव्हिटी दर

कालावधी चाचण्या बाधितांची संख्या पॉझिटिव्हिटी दर

27 एप्रिल 16, 650 3, 871 23.24 %

28 एप्रिल 20,277 3,978 19.62 %

29 एप्रिल 20,501 4,895 23.87%

30 एप्रिल 19,537 4,119 21.08%

1 मे 19,336 4,069 21.04%

2 मे 16,610 4,044 24%

3 मे 12,276 2,579 21%

4 मे 15,098 2,879 19.19%

5 मे 19,790 3,260 16.40%

6 मे 18,862 2,902 19.19%

7 मे 16,763 2,451 14.52%

8 मे 17,118 2,837 16.57%

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.