पुणे – मागील काही दिवसांपासून दडी मारुन बसलेला पाऊस गुरुवारी सक्रिय झाला. त्यानंतर शुक्रवारी दिवसभर तो सुरूच होता. मात्र, शनिवारनंतर पुणे शहर परिसरात पावसाचे प्रमाण कमी होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
शुक्रवारी सकाळपासून शहराच्या विविध संततधार पावसाने हजेरी लावली होती. मात्र दुपारी ऊन, ढगाळ वातावरण आणि पुन्हा पावसाची सर असे वातावरण पुणेकरांनी अनुभवले. पेठांसह मध्यवर्ती भाग शिवाजीनगर, बाणेर, कोथरूड, धनकवडी, कात्रज, हडपसर, सिंहगड रस्ता या भागांत पावसाने हजेरी लावली.