पुणे – कॉंग्रेसचे ‘माझे संविधान, माझी जबाबदारी’ अभियान

पुणे – केंद्र शासनाकडून घेण्यात येणाऱ्या निर्णयामुळे देशाचे संविधान धोक्‍यात आले असल्याचे सांगत येत्या 14 एप्रिलपासून पुणे लोकसभा मतदार संघात कॉंग्रेससह आंबेडकरी चळवळीतील संघटनांच्या माध्यमातून “माझे संविधान, माझी जबाबदारी’ अभियान घेण्यात येणार आहे. त्याअंतर्गत सुमारे 100 संविधान बचाव कॉर्नर सभा घेण्यात येणार असल्याची माहिती कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहाराध्यक्ष चेतन तुपे, रिपब्लिकन युवा मोर्चा अध्यक्ष राहुल डंबाळे, आर.पी.आय. कवाडे गटाचे प्रकाश भालेराव, बबनराव अडसूळ, दलित पॅंथर अध्यक्ष प्रकाश साळवे, भीम आर्मीचे दत्ता पोळ यावेळी उपस्थित होते.

बागवे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात देशांतर्गत संविधान धोक्‍यात आले आहे. संविधानात्मक हक्‍क अधिकार धोक्‍यात आणून देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे घेऊन जाण्याचा भारतीय जनता पक्षाकडून प्रयत्न सुरू आहे. मात्र, भाजपच्या या भूमिकेला विरोध करत संविधान संरक्षणाच्या बाबीवर समस्त आंबेडकरी संघटना कॉंग्रेससोबत आहेत. त्यामुळे सर्वांनी एकत्र येत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनाचे औचित्य साधून “माझे संविधान, माझी जबाबदारी’ अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानात रिपब्लिकन युवा मोर्चा, पिपल्स रिपब्लिकन पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गट, दलित पॅंथर, भीम आर्मी, स्वाभीमानी रिपब्लिकन पक्ष, स्वारिप युथ रिपब्लिकन आदी पक्ष संघटना सहभागी होणार आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.