पुणे सायबर पोलिसांकडे तक्रार अर्ज
पुणे – इंग्रजी वृत्तवाहिनी कार्यक्रमातील मुलाखतीत हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याबाबत बेताल वक्तव्य केल्याप्रकरणी अभिनेत्री कंगना राणावत विरूद्ध पुणे सायबर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष समीर उत्तरकर यांनी तक्रार अर्ज दाखल केला आहे.
इंग्रजी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमातील मुलाखतीत अभिनेत्री वंâगणा राणावत हिने हिंदुस्थानला ब्रिटिशांकडून मिळालेल्या स्वातंत्र्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले. याप्रकरणी वंâगणाचे वक्तव्य शहिदांसह सैनिकांचा अपमान करणारे आहे.
त्यामुळे समाजाच्या भावना दुखाविल्याप्रकरणी तिच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे युवक शहराध्यक्ष समीर उत्तरकर यांनी तक्रार अर्जाद्वारे सायबर पोलिस ठाण्यात केली आहे.