पुणे – लग्नानंतरच्या वादाला कंटाळून महिलेने पतीपासून घटस्फोट घेतला. त्यानंतर संबंधित महिलेने प्रियकरासोबत लग्न करण्याचे ठरविले होते. मात्र, नवऱ्याने पुन्हा संसार करण्याचा तगादा आणि प्रियकराकडून लग्नाची सतत विचारणा होत होती. दोघांच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली.
अपर्णा अनिल अभंगे (22, रा. येरवडा) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती अनिल अभंगे याच्यासह एकाविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.