पुणे व्यापारी महासंघाची व्यापारी संघटनांसाठी अनोखी स्पर्धा
पुणे – शहरातील व्यापारी बांधवांमध्ये पर्यावरण जागृतीसाठी पुणे व्यापारी महासंघ आणि लायन्स क्लब ऑफ इंटरनॅशनलकडून “ई-कचरा गोळा करा आणि मिळवा रोख बक्षीस’ या अनोख्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेत जास्तीत जास्त ई-कचरा संकलित करणाऱ्या शहरातील व्यापारी संघटनांना रोख बक्षीस देण्यात येणार आहे. ही माहिती पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका आणि सचिव महेंद्र पितळीया यांनी दिली. या स्पर्धेत व्यापारी संघटनांनी सहभागी होऊन जास्तीत जास्त ई-कचरा संकलित करावा, असे आवाहन रांका आणि पितळीया यांनी केले.
या वेळी अरविंद कोठारी, लायन्स क्लबचे प्रांतपाल, सुनील चेकर, मिलिंद शालगर, यशस्वी पटेल, राहुल हजारे, बॉबी मैनी आदी उपस्थित होते.
असे मिळणार बक्षीस
प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या व्यापारी संघटनेस अकरा हजार रुपये, द्वितीय क्रमांकास आठ हजार रुपये आणि तृतीय क्रमांकास पाच हजार रुपये रोख बक्षीस देण्यात येणार आहे. लायन्स क्लब इंटरनॅशनलकडून स्पर्धेत विजेत्या संघनटेस ई-प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात येणार आहे.
या वस्तूंचे संकलन
ई-कचऱ्यात मोबाइल संच, लॅपटॉप, फ्रीज, केबल, वॉशिंग मशीन, स्पीकर, दूरचित्रवाणी संच, मायक्रोफोन, मायक्रोओव्हन, टेपरेकॉड्रर, प्रिंटर्स, चार्जर, पेनड्राइव्ह, डिजिटल कॅमेरा, वातानूकुलन यंत्र आदी वस्तू संकलित केल्या जाणार आहेत.
उपक्रम कधी? कोठे?
शनिवार, दि. 11 फेब्रुवारी रोजी शहराच्या वेगवेगळ्या भागांत