पुणे : दिल्ली येथे पार पडलेल्या तबलीगी जमातीच्या कार्यक्रमात पुणे जिल्ह्यातील सहभागी झालेले आतापर्यंत चाळीस लोक पोलिसांनी शोधून काढले आहेत. त्यामध्ये पिंपरी चिंचवड, पुणे जिल्हा आणि पुणे शहरातील नागरिकांचा समावेश आहे. यातील अनेक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.या कार्यक्रमासाठी देश विदेशातील नागरिक सहभागी झाले होते.
पोलिसांनी देखील पुण्यातील नागरिक सहभागी झालेल्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 136 नागरिकांची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यातील काहीजणांची माहिती पोलिसांनी मोबाईल लोकेशनवरून शोधून काढली आहे. तर इतर लोकांचा पोलीस शोध घेत आहेत.
दरम्यान, नांदेड जिल्ह्यातील काही लोक यात गेले होते. त्यातील 12 लोकांचा शोध घेतला जात आहे.