चितळे आणि रिसायकल कंपनीचा पर्यावरणपूरक पुढाकार

मिल्क पाऊच परत घेण्याचा डिजिटल उपक्रम

पुणे – चितळे उद्योग समूह व Recykal प्लॅटफॉर्म यांनी प्लास्टिक पुनर्निर्मितीसाठी कार्यान्वित करण्यात येणाऱ्या Reloop योजनेची सुरुवात जागतिक पर्यावरण दिन 5 जून रोजी करण्यात येणार आहे. ही माहिती चितळे समूहातर्फे अनंत, अतुल, पुष्कर व केदार चितळे तसेच Recykal या कंपनीचे संचालक अभिषेक देशपांडे आणि चेतन बारेगर यांनीं दिली.

Recykal हा डिजिटल प्लॅटफॉर्म प्लॅस्टिक व इतर पुनर्निर्मिती करण्यायोग्य सामान, शास्त्रीय पद्धतीने पुनर्निर्मिती करण्यासाठी एक माध्यम उपलब्ध करून देते. UZED या मोबाइल ऍपद्वारे प्लॅस्टिक विघटन यंत्रणा शेवटपर्यंत करण्याचे नियोजन केले आहे. ऍप गुगल प्ले स्टोर आणि ऍप स्टोअरमध्ये उपलब्ध आहे. यामधून चितळे दूध व इतर खाद्यपदार्थ वापरणाऱ्या ग्राहकांना सर्व माहिती व सूचना या ऍपमध्ये देण्यात आलेल्या आहेत. कलेक्‍शन सेंटरचे लोकेशन व माहिती या ऍपमध्ये आहे.

ग्राहकाने जमा केलेल्या प्लॅस्टिकच्या बदल्यात ग्राहकास पॉईंटस देणेत येतील. जमा झालेले सर्व प्लॅस्टिक विघटन प्रक्रिया करणाऱ्या उद्योगास कच्चा माल म्हणून पुरवठा करण्यात येणार आहे. हडपसरपासून सुरू होणारा रीलूप हा पथदर्शी प्रकल्प 9 महिने चालणार असून सुरुवातीला हडपसरमध्ये चितळेंच्या दूध पिशव्या जमा करण्यासाठी 230 ड्रॉप पॉईंटस निर्माण केले आहेत. शेवटच्या महिन्यांपर्यंत शहरातून सुमारे 500 ते 600 टन प्लॅस्टिक कचरा जमा होईल अशी
अपेक्षा आहे. त्यानंतर या प्रयोगाच्या विस्तारीकरणावर विचार केला जाणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)