अबब ! दोन लाखात घेतला रीन साबण 

पुणे – ब्रिटीशकालीन घड्याळाच्या नावाखाली एका भामट्याने दोन लाखात रीन साबण एकाच्या माथी मारला. ही घटना खडकी येथील कॅन्टोमेंट हॉस्पिटलमागे घडली. याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात समीर नावाच्या व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.

फिर्यादी राकेश दिनेश रावल(38,रा.सिध्दांत कॉम्पलेक्‍स, अंधेरी ईस्ट मुंबई ) यांना आरोपीने ब्रिटीश कालीन घड्याळ देण्याचे आमिष दाखवले होते. त्यासाठी त्यांच्याकडून दोन लाख रुपये स्विकारण्यात आले. दोन लाख रुपये घेतल्यावर त्यांना रीन साबण वर्तमानपत्राच्या कागदात गोल गुंडाळून दिला. यानंतर आरोपीने तातडीने तेथून काढता पाय घेतला. फिर्यादीने हा कागद उघडून बघितला असता त्यामध्ये रीन साबण आढळला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.