#PuneCrime | खूनाचा प्रयत्न ; दोन सख्ख्या अल्पवयीन भावांना घेतले ताब्यात

भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी

पुणे – खुनाचा प्रयत्न करणारे दोन सख्ख्या अल्पवयीन भावांना भारती विद्यापीठ पोलिसांनी चोवीस तासांमध्ये ताब्यात घेतले. त्यांनी एका व्यक्तीवर कोयत्याने वार केले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार दिनांक 24 मे रोजी रात्री 8.30 वा सुमारास आंबेगाव बु।। शिवरत्न चौकाजवळ ओढयाच्या कडेला रविंद्र राजेंद्र दिसले (रा.श्रीपाद हाईटस जांभुळवाडी) यांस दोन सख्या अल्पवयीन भावांनी अडवले. त्यांना जुन्या भांडणाच्या कारणावरुन जिवे ठार मारण्याचे उददेशाने कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केले.

दिसले यांनी दिलेल्या तक्रारीवरुन भारती विदयापीठ पोलीस ठाण्यात खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा केलेनंतर गुन्हयातील आरोपी हे पसार झाले होते. आरोपीचा भारती विदयापीठ पोलीस ठाणे तपास पथकातील अधिकारी कर्मचारी शोध घेत असताना तपास पथकातील अंमलदार गणेश सुतार व शिवदत्त गायकवाड यांना आरोपी हे अल्पवयीन मुले असुन ते धायरी येथील धायरेश्वर मंदिराजवळ येणार असल्याची खबर मिळाली. त्यानूसार पोलिसांनी धायरेश्वर मंदिराजवळ जावुन सापळा लावुन दोन संशयीत अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले.

त्यांना विश्वासात घेवुन त्यांचेकडे चौकशी करता रविंद्र राजेंद्र दिसले याने काही दिवसांपुर्वी त्यांना मारहाण केली होती. त्याच कारणामुळे त्यांनी दिसले यांचेवर कोयत्याने वार करुन जीवे ठार मारणेचा प्रयत्न केला असल्याचे सांगितले. दोन्ही बालकांना गुन्हयात ताब्यात घेतले असुन पुढील तपास संगिता यादव पोलीस निरीक्षक गुन्हे करत आहेत.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे , उपायुक्त सागर पाटील,सहायक आयुक्त सुषमा चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलीस निरीक्षक संगिता यादव, प्रकाश पासलकर, सहा.पोलीस निरीक्षक वैभव पवार, पोलीस अंमलदार श्रीधर पाटील,, प्रणव संकपाळ, , जगदीश खेडकर,राजु वेगरे रविंद्र बोराडे यांच्या पथकाने केली

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.