#PuneCityCoronaUpdate : दिवसभरात नवे ६ हजार ६२५ कोरोनाबाधित

पुणे : शहरात आज (रविवार, ४ एप्रिल २०२ १) नव्याने ६ हजार ६२५ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता २ लाख ९० हजार ०४४ इतकी झाली आहे. तर शहरातील ३ हजार ७६२ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या २ लाख ४२ हजार ६५२झाली आहे.

दिवसभरात १७ हजार ७७४ टेस्ट !

पुणे शहरात आज एकाच दिवसात १७ हजार ७७४ नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता १५ लाख ५७ हजार ६२७ इतकी झाली आहे.

तसेच पुणे शहरात उपचार घेणाऱ्या ४१ हजार ९४० रुग्णांपैकी ९०१ रुग्ण गंभीर तर ३,८७६ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. 

आज पुणे महापालिका हद्दीत नव्याने ४१ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या ५ हजार ४५२ इतकी झाली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.