PUNE : कचर्‍याच्या ढिगार्‍यात आढळले बालक; दत्तवाडी पोलिसांनी परिसर पिंजुन काढत लावला आईचा शोध

पुणे – नाल्याच्या कडेला असलेल्या कचर्‍याच्या ढिगार्‍यात नवजात बालक आढळ्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सोमवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास दांडेकर पुल येथील पेट्रोल पंपासमोरील नाल्याच्या कडलेला असलेल्या कचर्‍याच्या ढिगार्‍यात बालक सापडले. याप्रकरणी बालकाला ढिगार्‍यात सोडून देणार्‍या त्याच्या आईचा पोलिसांनी शोध घेऊन बालकासह दोघांना ससून रूग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेला दोन मुले असून कौटुंबिक वादातून पती तिच्याकडे लक्ष देत नव्हता. याच दरम्यान महिला गर्भवती राहिल्यानंतर घरच्या घरी तिची प्रसुती झाली. परंतु, मुलाला सांभाळणे कठीण असल्याने शेवटी तिने त्या बालकाला दांडेकर पुलानजीक असलेल्या नाल्याजवळील कचर्‍याच्या ढिगार्‍यात सोडले. दुसर्‍या दिवशी एका महिलेला याची खबर मिळाल्यानंतर महिलेनी दत्तवाडी पोलिस ठाणत खबर दिली. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक आर. जे. कस्पटे आणि त्यांच्या अमंलदारांनी दत्तवाडी पोलिस ठाण्याचा परिसर पिंजुन काढत महिलेचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.

त्यावेळी त्यांनी बाळाच्या आईबद्दल माहिती मिळाली. त्यांनी तात्काळ बाळाला महिलेकडे देऊन तिला पुढील उपचारासाठी ससून रूग्णालयात दाखल केले. परंतु, महिलेवर नवजात बालकाला उघड्यावर टाकून त्याच्या जीवाला धोका निर्माण होईल अशा रितीने टाकुन देवुन निघुन गेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेमके कोणत्या परिस्थितीतून महिलेला हे पाऊल उचलावे लागले याचा शोध तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक आर. जे. कस्पटे करत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.