हडपसर – राष्ट्रवादी काँग्रेस- महायुतीचे हडपसर विधानसभा मतदार संघाचे उमेदवार चेतन तुपे पाटील यांनी हडपसर गाव, सय्यदनगर, कोंढवा, कात्रज येथे प्रचार दौरा केला. यावेळी त्यांनी मतदारांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्याशी संवाद साधत, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी लोकांचा भरभरून प्रतिसाद लाभला. त्यावेळी प्रत्येकाच्या चेहर्यावर आनंद, जोश आणि विश्वास यामुळे चेतन तुपे पाटील यांना हडपसर मतदारसंघात निवडून आणण्याचा निर्धार दिसून आला.
तुपे यांनी हडपसर ग्लायडिंग सेंटरला भेट दिली. या परिसरात अनेक नागरिक मॉर्निंग वॉकसाठी येतात. त्यांच्यासोबत चेतन तुपे यांनी संवाद साधला. यावेळी आपणच विजयी होणार, अशा शब्दांत भेटणाऱ्या व्यक्तींनी तुपेंना शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी महापौर वैशाली बनकर, माजी नगरसेवक मारुती आबा तुपे, सुनील बनकर, डॉ. शंतनु जगदाळे उपस्थित होते. कात्रज भागातील प्रतिष्ठित, सामाजिक व राजकीय कार्यात सक्रिय असणारे विकास नाना फाटे, माऊली कुंभार, गुलाबराव बलकवडे, रमेशराव बलकवडे, संदीप आवारे, अजय साबळे, गणेश थोरात, बाळासाहेब वरखडे आदी मान्यवरांच्या भेटी घेवून त्याच्याशी चेतन तुपे यांनी संवाद साधला.
तसेच टिळेकर नगर भागातील भुराणी पार्क येथील दाऊदी बोहरा समाज धर्मगुरू हुझेफाभाई बामबोटवाला कलिमी मस्जिद आमिल, मुर्तजा मालदेवीवाला, मोईज मुल्ला मुस्तफा बोहरी, मुस्तफा पठाण, शब्बीर बरवानी, अनिस हवेलीवाला यांची सदिच्छा भेट घेतली.तुपे यांनी महायुतीला मतदान करण्याचे आवाहन केले.
यावेळी आमदार योगेश टिळेकर, कार्याध्यक्ष संदीप नाना बधे, नईम भाई, भुराणी पार्क येथील सोसायटीच्या सदस्य मुर्तजा मालदेवीवाला, मोइज मुल्ला, मुस्तफा बोहरी, मुस्तफा पाटण, शब्बीर बरवानी, अनिस हवेलीवाला आदी उपस्थित होते. दरम्यान, मतदारसंघातील अॅमेनोरा सिटी भागातील सिटिझन मंडळांना व मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासोबत संवाद साधून मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी साथ देण्याचे आवाहन चेतन तुपे यांनी यावेळी केले.