महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा दावा
मुंढवा : गेल्या पाच वर्षात विधानसभेत उत्कृष्ट कामगिरी केल्याने आमदार चेतन तुपे पाटील हे उत्कृष्ट संसदपटू म्हणून गौरविले आहेत.पुन्हा एकदा एक मत हडपसर विधानसभेच्या विकासासाठी द्या, असे आवाहन महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुंढाव्यात नागरिकांना केले.
त्यांच्या या पदयात्रेमुळे मुंढाव्यात चैतन्याचे वातावरण पसरले होते. मुंढवाकरांनीही त्यांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आमचे मत विकासालाच असून, चेतन तुपे पाटलांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आश्वासन दिले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महायुतीचे उमेदवार
चेतन तुपे पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आज मुंढवा परिसरातील काळभैरवनाथ मंदिर, गावठाण ,कोद्रेनगर, रेल्वे स्टेशन, धायरकर वस्ती ,पिंगळे वस्ती ,बी. टी कवडे रोड, भीम नगर ,जहांगीर नगर , सेंट पॅट्रिक टाऊन, माऊली नगर, मगरपट्टा तसेच हिंगणे मळा, ससाणे नगर ,काळेबोराटे नगर परिसरातून पदयात्रा व बाईक रॅली काढण्यात आली होती. यावेळी भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,शिवसेना , आरपीआय आठवले गट व मित्र पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते या पदयात्रेत सहभागी झाले होते.
“हडपसर विधानसभा मतदारसंघातील मुंढवा येथे आज ग्रामदैवत काळभैरवनाथ मंदिरात नाथांचे आशीर्वाद घेऊन प्रचाराचा शुभारंभ केला. काळभैरवनाथाचे मनोभावे दर्शन घेतले.नारळ वाढवून, पुष्पहार अर्पण करून आशीर्वाद घेवून प्रचाराची सुरुवात केली आहे. आपल्या हडपसरचे क्षेत्रपाल असलेले श्री काळभैरवनाथ यांची कृपा सर्वांवर राहो ,अशी मनोभावे प्रार्थना केली.”
चेतन तुपे पाटील, उमेदवार, महायुती हडपसर विधानसभा