पुणे – सहलीच्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक

वर्षभर फरार असणारा आरोपी जेरबंद

पुणे – सहलीच्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्यास दत्तवाडी पोलिसांनी जेरबंद केले आहे. संबंधीत आरोपी मागील वर्षभरापासून फरार होता. आशुतोष ब्रम्हे(43,रा.पुनावळे) असे आरोपीचे नाव आहे.

यासंदर्भात माहिती देताना पोलिसांनी सांगिततले, सेवानिवृत्त झालेल्या एका ज्येष्ठ नागरिकाने तक्रार दिली होती. त्यांच्या वाचनात एक काशी तिर्थस्थळाच्या पर्यटनाची जाहीरात आली होती. त्यांनी दिलेल्या नंबरवर आशुतोष यांच्याशी संपर्क साधला असता. त्याने तक्रारदार व इतर ज्येष्ठ नागरिकांना त्याच्या चिंचवड येथील साकार ट्रॅव्हल्सच्या कार्यालयात बोलावून घेतले. तेथे त्यांना ज्येष्ठ नागरिकांना विशेष सवलत देण्याचे तसेच घरापासून घरापर्यंत सोडण्याचे आमिष दाखवले. याप्रमाणे त्याने ज्येष्ठ नागरिकांच्या ग्रुपकडून 6 लाख 30 हजार रुपये घेतले. लक्षव्दिप आणी कन्याकुमारीसह इतर ठिकाणी सहलीस नेण्याचे आश्‍वासन दिले. मात्र पैसे घेतल्यानंतर त्याने सहलीला नेण्याची टाळाटाळ केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर दत्तवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांना तपासात ब्रम्हे हा दिलेल्या पत्त्यावर रहात नसल्याचे आढळून आले. तो वारंवार पत्ते बदलत असल्याने त्याला शोधणे अवघड झाले होते. दरम्यान वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदा घेवारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शंकर सलगर वर्षभर त्याच्या मागावर होते. दरम्यान ब्रम्हे हा स्वारगेट एसटी स्थानकातून बाहेरगावी एसटीने जाणार असल्याची खबर मिळाली. त्यानूसार पोलिसांनी साध्या वेशात सापळा रचून त्याला जेरबंद केले. त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने अशाच प्रकारे मार्केटयार्ड येथे रहाणाऱ्या ज्येष्ठ महिलांची फसवणूक केल्याचे समोर आले.

ही कारवाई पोलीस उपायुक्त मंगेश शिंदे, सहायक पोलीस आयुक्त बाजीराव मोहिते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदा घेवारे, पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शंकर सलगर व पोलीस शिपाई भारत आस्मर यांच्या पथकाने केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.