पुणे – महिला बालकल्याणच्या प्रशिक्षणाच्या तारखात बदल

पुणे – अंगणवाडीचे काम ऑनलाइन करण्यासाठी प्रत्येक अंगणवाडीसेविकेला आता मोबाइल दिला जाणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाकडून काही कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. हे प्रशिक्षण दि. 7 ते 15 मे दरम्यान होणार होते. परंतू, काही कारणास्तव या प्रशिक्षणाच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला असून, दि. 14 ते 21 मे दरम्यान भोसरीतील सीआयआरटी येथे हे प्रशिक्षण होणार असल्याची माहिती महिला व बालकल्याण विभागाकडून देण्यात आले.

प्रशिक्षणामध्ये उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या मोबाइलच्या माध्यमातून अंगणवाडीतील पूरक पोषण आहार, औषधांचे वाटप, बालकांच्या वजन आणि उंचीच्या नोंदी, लसीकरण यासह अन्य नोंदी ऑनलाइन कशा पद्धतीने कसे भरायचे, वेळोवेळी नोंदी अपडेट करणे याबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यामुळे अंगणवाडीतील कामकाजाला गती मिळणार असून, अधिकाऱ्यांनाही एका क्‍लिकवर जिल्ह्यातील सर्व दैनंदिन नोंदी आणि कामाचा आढावा मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे वेळेची बचत होवून, ग्रामीण भागातील अंगणवाड्या आता स्मार्ट होत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.