पुणे : छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने पुण्यात छत्रपती शिवाजी रस्ता आणि लक्ष्मी रस्त्याने मिरवणुका काढण्यात येणार आहेत. त्यामुळे या मार्गावरील पीएमपीएमएलच्या बस मार्गांमध्ये बदल करण्यात येणार आहे. येत्या बुधवारी (दि. १९) हे बदल केल्याचे पीएमपी प्रशासनाने कळविले आहे. दुपारी चारनंतर मुख्य मिरवणूक मार्गांवर हा बदल असणार आहे.
असा असेल बदल
– छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याने स्वारगेटकडे जाणाऱ्या सर्व बसेस जंगली महाराज रस्त्याने अलका टॉकीज चौकातून मंडईमार्गे स्वारगेटला जातील.
– मनपा भवनाकडून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गाने जाणाऱ्या सर्व बसेस ढोले पाटील रस्ता आणि फर्गसन रस्त्याने चालू राहतील.
– लक्ष्मी रस्त्याने जाणाऱ्या गाड्या पुणे स्टेशनपासून महात्मा गांधी बसस्थानक ते स्वारगेटमार्गे पुढे जातील.
– फडके हौदापासून जाणाऱ्या गाड्या कुंभारवाड्यापासून मनपा भवनाकडे जातील.
– भवानीमाता मंदिर रस्ता बंद झाल्यानंतर वाहतुक गोळीबार मैदान, स्वारगेटपासून कुमठेकर रस्त्याने सुरू राहील.
न. ता. वाडीकडून जाणाऱ्या गाड्या कुंभारवाडा, गाडीतळ, पुणे स्टेशनमार्गे जाऊन पुढे नियमित मार्ग घेतील.
– अप्पा बळवंत चौकातून जाणाऱ्या बसेस महापालिकेसमोरील बसस्थानकावरून जातील.