Pune : चांदणी चौक उड्डाणपुलाचे काम वेगाने पूर्णत्वाकडे

बावधन -चांदणी चौकातील नवीन उड्डाणपुलासाठी आवश्यक सर्व पिलर उभारण्यात आले आहेत. पुलाचे काम पुर्णत्वाकडे जात आहे. लवकरच नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून टप्याटप्याने गर्डर टाकून उड्डाणपूल महिन्याभरात पूर्ण होईल. रस्त्यांचे फायनल डांबरीकरण आणि रंगरंगोटी झाल्यावर उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होईल आणि खऱ्या अर्थाने चौक कोंडीतून मोकळा होईल.
केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी चांदणी चौक प्रकल्पाचे उद्घाटन दि. 15 जुलैला करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार चौकातील नवीन उड्डाणपुलाचे काम गतीने सुरू असून जवळपास 60 टक्के काम पूर्ण झाले आहे. आता, गर्डर टाकण्याअधीची कामे अंतीम टप्यात असून जूनच्या पहिल्या आठवड्यात टप्याटप्याने वाहतूक पर्यायी मार्गाने वळवून गर्डर टाकण्याचे काम सुरू होईल.
पुलाचे काम नवीन तंत्रज्ञाचा वापर करून करण्यात येत असल्याचे गर्डर टाकल्यानंतर डांबरीकरण आणि सुशोभिकरण पूर्ण झाल्यावर उड्डाणपूल वाहतुकीसाठी खूला होईल. यासाठी सर्व कामासाठी एक महिना वेळ लागणार आहे. अन्य, कामे जुलै अखेरपर्यंत पूर्ण होतील, असे प्रकल्प अभियंत्यांकडून सांगण्यात आले.
अंडरपास आणि सर्व्हिस रस्त्याचे काय?
मुळशीकडून बावधन, मुंबईला जाणाऱ्या सीएनजी पंपाच्या अलीकडील सर्व्हिस रस्त्याचा तसेच वेदभवन येथील जागेचा प्रश्नही सुटलेला नाही. त्यामुळे अंडरपास सुरू कसा आणि कधी होणार? “एनएचएआय’ने वेदभवन येथे नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्यने अंडरपाससाठी आवश्यक पिलर उभारण्याचे काम पूर्ण केले आहे जागेचा प्रश्न सुटल्यानंतरच गर्डर टाकणे आणि रस्ता खोदून अंडरपास करता येईल. तोपर्यंत प्रकल्पातील या दोन समस्या कायमच राहणार आहेत.
चौकातील सुशोभिकरण अंतिम टप्प्यात
चौकात मोठ्या वर्तुळीय दुभाजकात मध्यभागी हायमास दिवा लावण्यात आला आहे. आता रणगाडा, विमान आणि जहाजाची मेटलमधील प्रतिकृती उभारण्यासाठीच्या चौथऱ्याचे बांधकाम सुरू आहे. जुन महिन्यात या चौकाचेही काम पूर्ण होईल. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी लावलेली फुलांचे झाडे प्रवास सुखाचा करीत आहेत.





