पुणे – खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार धरणांच्या पाणलोट क्षेत्रात शनिवारी दिवसभर जोरदार पाऊस झाला. त्यामुळे खडकवासला धरणातून दिवसभरात विसर्गामध्ये टप्प्याटप्याने वाढ करण्यात आली. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास खडकवासला धरणातून 27 हजार 841 क्युसेकने पाणी नदीत सोडण्यात आले.
पावसामुळे या चारही धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली. पर्यायाने पानशेत, वरसगाव आणि टेमघर या तीन धरणांतून पाणी सोडण्यास सुरुवात झाली. या तीन धरणांतून सोडलेले पाणी खडकवासला धरणात जमा होते. तसेच पाऊस पडताच ओढे-नाले वेगाने वाहू लागले. त्यामुळे धरणांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली. दिवसभरात खडकवासला धरणात 40, पानशेत- 116, वरसगाव-112 आणि टेमघर धरणात 150 मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे धरणात पाण्याचा येव्यात मोठी वाढ झाली.
खडकवासला धरणातील विसर्ग
सकाळी 10 वा. – 1,462 क्युसेक
सकाळी 11 वा. – 2,140 क्युसेक
दुपारी 2 वा. – 8,734 क्युसेक
दुपारी 3 वा. – 12,958 क्युसेक
सायंकाळी 4 वा-19,118 क्युसेक
सायंकाळी 6 वा -.23,122 क्युसेक
रात्री 8 वा. – 27,841 क्युसेक
पानशेत धरणातील विसर्ग
सकाळी10 वा. – 1,449 क्युसेक
दुपारी 2 वा. – 3,996क्युसेक
सायंकाळी 4 वा. – 8,920 क्युसेक
वरसगाव धरणातील विसर्ग
दुपारी 2 वा. – 4,262 क्युसेक
सायंकाळी 4 वा. – 9,025 क्युसेक
टेमघर धरणातील विसर्ग
सकाळी 7 वा. -869 क्युसेक
धरणाचे नाव पाणीसाठा टक्के
खडकवासला – 1.69 टीएमसी – 85.53 टक्के
पानशेत – 10.46 टीएमसी – 98.23 टक्के
वरसगाव – 12.76 टीएमसी -99.54 टक्के
टेमघर – 3.71 टीएमसी – 100 टक्के
एकूण – 28.62 टक्के – 98.18 टक्के