पुणे – सीबीएसई निकाला पुणे शत-प्रतिशत

बहुतेक शाळांचा निकाल 100 टक्‍के

पुणे – सेंट्रल बोर्ड ऑफ सेंकडरी एज्युकेशन अर्थात सीबीएसई बोर्डाने घेतलेल्या बारावी परीक्षेच्या निकालात पुण्यातील बहुतांश शाळांचा निकाल 100 टक्‍क्‍यांच्या जवळपास लागला आहे. तसेच, 90 टक्‍क्‍यांहून अधिक गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांची संख्याही लक्षणीय असल्याचे दिसून येत आहे. या निकालात विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.

दिघी येथील आर्मी पब्लिक स्कूलचा निकाल 100 टक्‍के लागला आहे. या स्कूलमध्ये साहिल मोहिते हा विज्ञान शाखेतून 94.4 टक्‍के घेत प्रथम आला आहे. तर वाणिज्य शाखेत खुशी सचदेव 92 टक्‍के घेत प्रथम, तर कला शाखेतून रम्या आर हिने 91.8 टक्‍के प्रथम स्थान मिळविले आहे.

महमंदवाडी येथील दिल्ली पब्लिक स्कूलचेही सर्व 141 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 77 विद्यार्थ्यांना 90 टक्‍क्‍यांहून अधिक गुण मिळाले आहेत. 130 विद्यार्थ्यांना 80 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त, तर 133 विद्यार्थ्यांनी 75 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त गुण मिळविले आहेत. स्कूलमध्ये शुभा मुखर्जी ही विद्यार्थिनी 97.8 टक्‍के घेत प्रथम क्रमांक मिळविली आहे. तसेच, संस्कृती स्कूलच्या सर्व शाखेचा निकालही शंभर टक्‍के लागला आहे. आदित देशपांडे हा विद्यार्थी 97.2 टक्‍के गुण टॉपर आला आहे. सिद्धार्थ मुंगळे हा 93.2 टक्‍के घेत द्वितीय, तर स्नेहल कौशल 88.8 टक्‍के घेत तृतीय क्रमांक मिळविला. सर्वच विद्यार्थ्यांना 70 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त गुण मिळाले आहे.

डीएव्ही पब्लिक स्कूला निकालही 100 टक्‍के लागला आहे. उत्तीर्णामध्ये 101 मुले आणि 113 मुली असे एकूण 124 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. स्कूलची स्नेहा गोंडूकुपी ही विद्यार्थिनीने 97.6 टक्‍के प्रथम क्रमांक मिळविली. स्कूलमध्ये 24 विद्यार्थ्यांनी 95 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त गुण, तर 90 ते 95 टक्‍यांच्या दरम्यान गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या 66 आहे. 65 ते 70 टक्‍क्‍यांदरम्या मिळालेल्या विद्यार्थी केवळ 5 एवढेच आहे. ऋतिक गोयल या दिव्यांग विद्यार्थ्यांने 81.6 टक्‍के मिळविला आहे.

दरम्यान, पत्रकानगर येथील अशोक विखे पाटील मेमोरिअयल स्कूल, अक्षरा इंटरनॅशनल स्कूल, उंड्री येथील वात्सल्य स्कूल, जेएसपीएमच्या ब्लॉसम पब्लिक स्कूल, गोयल गंगा इंटरनॅशनल स्कूल, ऑर्बिस स्कूलसह अन्य शाळांच्या निकाल 100 टक्‍क्‍यांच्या आसपास लागला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.