पुणे – सैन्याचा कल भांडवल गुंतवणुकीकडे

पुणे : “सैन्य दलात सध्या मोठे बदल व्हावे, सैन्याचा जास्तीत जास्त निधी शस्त्रास्त्र निर्मितीसाठी खर्च व्हावा, अशी मागणी सातत्याने समोर येत होती. त्याच अनुषंगाने संरक्षण मंत्रालयातर्फे सैन्यदलात कपात करण्याबरोबरच जे “अतिमहत्त्वाचे’ या वर्गात सामाविष्ट नाहीत, असे युनिट बंद करण्याचा निर्णयदेखील घेण्यात आला आहे. याचा मूळ उद्दिष्ट हे सैन्यदलाच्या शस्त्रास्त्र सज्जतेसाठी भांडवल गुंतवणुकीवर भर देण्याकडे कल असल्यानेच हे निर्णय घेतले,’ असल्याचे दक्षिण मुख्यालयप्रमुख लेफ्टनंट जनरल एस. के. सैनी यांनी मंगळवारी माध्यमांशी बोलताना सांगितले.

सैनी म्हणाले, “संरक्षण मंत्रालयातर्फे स्थापन केलेल्या केंद्रीय समितीतर्फे लष्करात काही सुधारणा करण्याची आवश्‍यकता असल्याचे नमूद करण्यात आले आहे. विशेषत: सैन्याला जो निधी दिला जातो, त्यातील बहुतांश भाग हा पेन्शन, वेतन, विविध भत्ते यावर खर्च होतो. त्यामुळेच शस्त्रास्त्र सज्जतेवर त्याचा परिणाम होतो. ही परिस्थिती बदलण्यासाठी लष्करात काही मोठे बदल होणे आवश्‍य असल्याचे या समितीने सांगितले आहे. त्याच अनुषंगाने लष्कराकडून सैन्य कपात, अतिमहत्त्वाचे नसलेले संस्था बंद करणे यासारखे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून, आगामी काळात या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली जाणार आहे.’

सद्यस्थितीत लष्कराने आपले लक्ष शस्त्रास्त्र खरेदी, निर्मिती आणि निर्यात या क्षेत्राकडे केंद्रीत केले असून, देशात यासंदर्भातील विविध प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे भांडवली गुंतवणूक आवश्‍यक असल्याचेही सैनी यांनी अधोरेखित केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)