पुणे – नोटिसांमुळे कॅन्टोन्मेंट बोर्डाला डोकेदुखी

लवकर सुनावणी होत नसल्याने कामकाजावर भार

पुणे – लष्करी हद्दीतील मालमत्तांच्या नूतनीकरण, दुरुस्ती आणि बांधकामासंर्भात देण्यात येणाऱ्या नोटीस या कॅन्टोन्मेंट बोर्डासाठी डोकेदुखी ठरत आहे. दिवसागणिक वाढत जाणाऱ्या नोटीसांवर लवकर सुनावणी होत नसल्याने बोर्डाचे कामकाज तर वाढतेच, मात्र परिसरातील अनधिकृत बांधकामातदेखील वाढ होत आहे.

लष्कर परिसरातील बांधकामांना परवानगी देण्याचे काम बोर्डाकडून केले जाते. सध्यस्थितीत बोर्डाकडे बांधकाम संदर्भातील 125 प्रस्ताव प्रलंबित आहेत. यामध्ये मालमत्ता हस्तांतरणाचा प्रस्तावदेखील समाविष्ट आहे. मात्र, प्रत्यक्ष जागेची पाहणी करण्यासाठी मनुष्यबळाचा अभाव, मूळ जागा मालकाचा आणि भाडेकरूची उपस्थिती अशा विविध कारणांमुळे या प्रस्तावांना लवकर मान्यता दिली जात नाही. त्याचवेळी बांधकामांना नोटीस नियमितपणे बजावण्यात येते. मात्र, त्या तुलनेत या नोटिसांबाबत सुनावणी केली जात नाही. त्यामुळे या नोटीस म्हणजे बोर्डासाठी डोकेदुखी ठरत आहे.

याबाबत बोर्डाच्या लोकप्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली आहे. बोर्डाच्या लोकप्रतिनिधींना फारसे अधिकार नाहीत. त्यामुळे या मालमत्तांच्या प्रत्यक्ष पाहणी करण्याचे अधिकार लोकप्रतिनिधींना नाही. त्यामुळे इच्छा असूनही यासंदर्भात लोकप्रतिनिधी काम करू शकत नाही, याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×