पुणे :– लष्करी अस्थापना आणि नागरी भागाचा समावेश असलेल्या वानवडी परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून कटिबद्ध असल्याचे आश्वासन पुणे कॅन्टॉन्मेंट विधानसभा मतदारसंघातील भाजप, महायुतीचे उमेदवार आमदार सुनील कांबळे यांनी दिले.
कांबळे यांनी सकाळी वानवडी परिसरातील उद्यानांमध्ये भेट देत मतदारांशी संवाद साधला, तर संध्याकाळी या भागात पदयात्रा काढण्यात आली. या वेळी कांबळे यांनी या परिसरात केलेली विकासकामे, तसेच पुढील पाच वर्षांत केल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या कामांची माहिती मतदारांना दिली.
श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुलेंच्या पुतळ्यास पुष्पहार करून वानवडी बाजार येथून पदयात्रेस सुरुवात करण्यात आली. भाजपाचे सरचिटणीस महेश पुंडे, माजी नगरसेविका कालिंदा पुंडे यांच्यासह नगरसेवक धनराज घोगरे व लक्ष्मी घोगरे, कोमल शेंडकर, समीर शेंडकर, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष सचिन मथुरावाला, दिनेश होले यांच्या वतीने पदयात्रेचे जंगी स्वागत करण्यात आले.
“भागात विद्युत वाहिन्यांच्या ओव्हरहेड तारा नागरिकांसाठी धोकादायक असल्याने मतदारसंघातील अशा धोकादायक तारा भूमिगत करण्याचा कामास सुरुवात झाली आहे. याशिवाय वाहतूक कोंडी, तसेच पाण्याची समस्या सोडविण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना केल्या जाणार आहेत.”
– सुनील कांबळे (भाजप, महायुती उमेदवार)
राष्ट्रवादीचे शहर सरचिटणीस दिलीप जांभुळकर, कॅन्टोन्मेंट अध्यक्ष नरेश जाधव, मुनीरभाई सय्यद, प्रसाद चौघुले, दत्ता जाधव, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते संजय सोनवणे, बाळासाहेब जानराव, महेंद्र कांबळे, संदीप धांडोरे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.