पुणे – करोना प्रतिबंधक लसीचे सोमवारी 199 केंद्रांवर नियोजन करण्यात आले असून, दोन्ही लस उपलब्ध असणार आहेत.
कोविशील्डचे 188 केंद्रांवर प्रत्येकी 250 डोस उपलब्ध करून देण्यात आले असून, कोवॅक्सिनचे 11 केंद्रांवर प्रत्येकी 300 डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
ज्यांना कोविशील्डचा जो पहिला डोस मिळणार आहे, त्याच्या ऑनलाइन बुकिंगची टक्केवारी 10 टक्के असून, ऑन दी स्पॉट बुकिंगही 10 टक्के आहे. तर कोवॅक्सिनचा जो पहिला डोस मिळणार आहे. त्यातील 10 टक्के लस ही ऑनलाइन बुकिंग करून, तर 10 टक्के ऑन दी स्पॉट नोंदणी करून मिळेल.