Pune | सासवड रस्त्यावरील तेलाच्या गोदामासह चार गोदाम जाळून खाक; तेल पसरल्याने आगीने केले रौद्ररूप धारण

पुणे,दि.16 – सासवड रस्त्यावरील वडकी गावात खाद्यतेलाच्या गोदामासह शेजारील तीन गोदामाला काल मध्यरात्री रात्री उशिरा आग लागली. या आगीत चारही गोदामे जळून खाक झाली. आगीत सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नसून मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे.

वडकी गावात असलेल्या तेलाच्या गोदामाला शनिवारी (दि.15 ) रात्री उशिरा आग लागल्याची माहिती अग्निशामक दलाला मिळाली होती. त्यानंतर सुरवातीला तीन अग्निशमन दलाच्या गाड्या वडकीत घटनास्थळी पोहचल्या. तेलाच्या गोदामातील आग इतरत्र पसरू नये म्हणून फोमद्वारे आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. परंतु आग काही केल्या नियंत्रणात येत नव्हती.

जवान फोमबरोबरच पाण्याचा माराही आगीवर सुरु होता. गोदामात 500 ते 600 टन तेलाचा साठा असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्याशेजारीच वायरींचे गोदाम असल्यामुळे आगीने तेथेही पेट घेतला होता. दोन गोदामावरील आगीवर नियंत्रण मिळविण्याच्या प्रयत्नात शेजारील वैद्यकीय साहित्याच्या गोदामाला आग लागली होती.

रविवारी दुपारी बारा वाजेपर्यंत कुलिंगचे काम सुरु असल्याचे अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितले. पीएमआरडीएच्या पाच गाड्या, अग्निशमन दलाच्या दोन त्याशिवाय दोन पाण्याचे टॅंकर याच्या मदतीने आग विझविण्यात आली. 50 हुन अधिक जवानांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.