PUNE – बैलगाडा शर्यत प्रकरण : एकाला जामीन

पुणे – उच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवर बंदी घातली असतानाही, त्या आदेशाचा भंग करून शर्यत आयोजित करून त्याला प्रतिबंध करणाऱ्या पोलिसांना धक्काबुक्की करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणात एकाला न्यायालयाने जामीन मंजुर केला आहे.

योगेश बाळासाहेब रेणूसे (वय 29, रा. नेरावणे, ता. वेल्हा) असे त्याचे नाव आहे. त्याने ऍड. राहुल नायर आणि ऍड. प्रसाद रेणूसे यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. रेणूसे याचा विशिष्ट रोल नाही. केवळ तो बैलगाडा शर्यतीला उपस्थित असल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडील तपास संपला आहे. त्यामुळे त्याला जामीन देण्याचा युक्तीवाद ऍड. राहुल नायर आणि ऍड. प्रसाद रेणूसे यांनी केला. हा प्रकार 17 जुलै रोजी कात्रज येथील गुजरवाडी बाबर मळा येथील डोंगराच्या बाजूला मोकळ्या असलेल्या जागेत घडला. याबाबत हवालदार रवींद्र चिप्पा यांनी फिर्याद दिली आहे.

त्यानुसार पोलिसांनी योगेश याच्यासह 12 जणांना अटक केली होती. अन्य 15 ते 20 जणांवर गुन्हा दाखल आहे. न्यायालयीन कोठडीत असताना त्याने जामिनासाठी अर्ज केला. तपासास सहकार्य करणे, पुराव्यात ढवळाढवळ न करणे आणि भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनला दोषारोपपत्र दाखल होईपर्यंत दर सोमवारी हजेरी लावण्याच्या अटीवर सत्र न्यायाधीश ए.व्ही.रोट्टे यांनी हा आदेश दिला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.