पुणे -करोना प्रतिबंधक लसीचे सोमवारी 198 केंद्रांवर नियोजन करण्यात आले असून, दोन्ही लस उपलब्ध असणार आहेत.
कोविशील्डचे 187 केंद्रांवर प्रत्येकी 100 डोस उपलब्ध करून देण्यात आले असून, कोवॅक्सीनचे 11 केंद्रांवर प्रत्येकी 200 डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना कोविशील्डचा जो पहिला डोस मिळणार आहे त्याच्या ऑनलाइन बुकींगची टक्केवारी 10 टक्के असून, ऑन दि स्पॉट बुकींगही 10 टक्के आहे. तर कोवॅक्सीनचा जो पहिला डोस मिळणार आहे. त्यातील 10 टक्के लस ही ऑनलाइन बुकींग करून, तर 10 टक्के ऑन दी स्पॉट नोंदणी करून मिळेल.
11 जुलैपूर्वी पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना जी लस मिळणार आहे त्याचे ऑनलाइन बुकींग 40 टक्के, तर 40 टक्के ऑन दि स्पॉट बुकिंग होणार आहे. 6 सप्टेंबरला कोवॅक्सिनचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्या 18 वर्षांवरील नागरिकांना 40 टक्के लस ऑनलाइन बुकिंगद्वारे, तर 40 टक्के लस ही ऑन दी स्पॉट नोंदणी करून मिळेल.