मुनगंटीवार घेणार पुणे भाजपची शाळा

पुणे – महापालिका तसेच लोकसभा निवडणुकीत विक्रमी मताधिक्‍य असतानाही विधानसभा निवडणुकीत दोन मतदारसंघांत भाजपला स्वीकारावा लागलेला पराभव तसेच इतर मतदारसंघांत घटलेले मताधिक्‍यांचा आढाव्यासह पक्षाच्या संघटनात्मक निवडणुकीचा आढावा आता माजीमंत्री सुधीर मुनगंटीवार घेणार आहेत. त्यासाठी ते लवकरच पुण्यात बैठक घेणार असून त्यात महापालिकेचा कारभार, नगरसेवकांची कामगिरी, शिवसेनेची विधानसभेच्या भूमिकेसह इतर विषयांवरही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची शाळा घेणार असल्याची माहिती पक्षातील उच्चपदस्थ सुत्रांकडून देण्यात आली.

अडीच वर्षांपूर्वी झालेल्या महापालिका आणि त्यानंतर दोन वर्षांनी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा मताधिक्‍याचा आलेख उंचालवला होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत पक्षाची ताकद वाढल्याने आठही जागा पुन्हा भाजपला मिळतील, असा विश्‍वास पक्षाकडून व्यक्‍त करत युतीचा मित्र असलेल्या शिवसेनेला भाजपने पुण्यात एकही जागा दिली नाही. उलट शिवसेना ज्या 3 जागा मागत होती. त्यातील हडपसर, वडगावशेरीमध्ये भाजपला कडवी झुंज देत पराभव पत्कारावा लागला. तर, इतर 6 मतदारसंघांत भाजपचे मताधिक्‍य कमालीचे घटल्याने रडतखडत विजय मिळवावा लागला. त्यामुळे दोन वर्षांनंतर होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीची तयारी भाजपने आतापासूनच सुरू केली आहे. परिणामी, भाजपच्या विधानसभेच्या घटलेल्या मताधिक्‍याची कारणमिमांसा करण्यासाठी मुनगंटीवार 25 नोव्हेंबरला पुण्यात येणार असल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.

शहर सरचिटणीसांनी सादर केला अहवाल
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील पक्षाच्या कामगिरीबाबत शहर सरचिटणीसांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. हे सर्व अहवाल शहराध्यक्ष आमदार माधुरी मिसाळ यांना देण्यात आले असल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले. त्यात प्रामुख्याने पुण्यातील महापालिकेचा कारभार आणि नगरसेवकांप्रती असलेली जनतेतील नाराजीचा फटका विधानसभा निवडणुकीत बसल्याचे निरीक्षण सरचिटणांनी सादर केलेल्या अहवालात नमूद केल्याचे सुत्रांनी स्पष्ट केले. तर पक्षाकडून शिवसेनेने विधानसभा निवडणुकीत युतीचा धर्म कितपत पाळला, याबाबतही विधानसभा मतदारसंघनिहाय अहवालात माहिती देण्यात आली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)