पुणे – बदलापूरमधील दुर्दैवी घटनेनंतर त्यावरून राजकारण करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून सुरू आहे, असा आरोप करत शनिवारी भाजपने महाविकास आघाडीच्या आंदोलनाचा निषेध करण्यात आला.
यावेळी काळ्या फिती लावून निदर्शने करण्यात आली. या प्रकरणात महायुती सरकार संवेदनशील आहे. संबंधित आरोपीला फास्ट ट्रॅक कोर्टात हजर केले जाईल. असे असतानाही चुकीच्या पद्धतीने राजकारण केले असल्याने निषेध केला जात असल्याचे शहराध्यक्ष धीरज घाटे या वेळी म्हणाले.
आंदोलनात महिला मोर्चा शहराध्यक्षा हर्षदा फरांदे, पुणे शहर सरचिटणीस रवि साळेगावकर, पुनीत जोशी, वर्षा तापकीर, गायत्री खडके, प्रियांका शेंडगे, अजय खेडेकर, सुनील पांडे, राजेश येनपुरे, दीपक पोटे, इम्तियाज मोमीन, सूरज दुबे, शैलेश बडदे, गणेश बगाडे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.