धनकवडी – भारतीय जनता पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार भिमराव धोंडिबा तापकीर यांनी खडकवासला मतदारसंघात विविध भागांतून भव्य बाईक रॅली आणि पदयात्रा आयोजित केली होती. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.
धनकवडीतील बालाजीनगर आणि भारती विद्यापीठ परिसरातून सकाळी नऊ वाजता भव्य बाईक रॅलीला सुरुवात झाली. यावेळी मोठ्या संखेने परिसरातील कार्यकर्ते सामील झाले होते. श्री जानुबाई मंदिर, तळजाई पठार, संभाजी नगर, तापकीर स्मृती, चैतन्यनगर, विद्या नगरी, कात्रज डेअरी, वंडर सिटी, नारायणी धाम, अशी बाईक रॅली आणि पदयात्रा काढण्यात आली.
यावेळी तापकीर यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या ऐकून घेत मतदारसंघाच्या प्रगतीसाठी आपले दृष्टिकोन स्पष्ट केले. यावेळी माजी उपमहापौर दत्तात्रय धनकवडे, माजी नगरसेविका वर्षा तापकीर, अश्विनी भागवत, राणीत भोसले, मोहिनी देवकर, आप्पा धावणे, भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष अरुण राजवाडे, संतोष फरांदे, विश्वास आहेर, युवराज रेणूसे, शंकर कडू.
अभिषेक तापकीर, सचिन बदक, गणेश पवार, सागर भागवत, सागर साबळे, आनंद शिंदे, दत्ता सावंत, अंकुश सोनवले, महेश भोसले, सत्यवान कामठे, सतिश घाटे, उल्हास खुटवड,दादा देवकर, पांडुरंग भोसले, सामाजिक कार्यकर्ते दिगंबर डवरी, प्रभाग अध्यक्ष अमोल चौधरी, रायबा भोसले, भाजपा सरचिटणीस युवा मोर्चा ओंकार डवरी, जितू कोंढरे, चिन्मय भोसले, राहुल पाखरे, रितेश रासकर, आनंद साळुंखे, अंकुश कोकाटे, मंगेश पवार तसेच मान्यवर कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.