पुणे: दोनशे कोटींचा चुना लावणारा भरतशेठ पोलिसांच्या जाळ्यात

उरुळी कांचन/लोणी काळभोर (वार्ताहर) – बेकायदेशीर गुंतवणुकीच्या नावाखाली उरुळी कांचन, लोणी काळभोर, हडपसरसह परिसरातील पाचशेहून अधिक गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा चुना लावणाऱ्या आरोपींना गुजरात पोलिसांनी पाकिस्तानच्या सीमेवरुन रविवारी (दि. 20) अटक केली. भरतकुमार चरणराज जोशी आणि त्याची दोन मुले हिरेन कुमार व दीपक कुमार अशी या आरोपींची नावे आहेत.

दरम्यान, जोशीने वर्ष ते तीन वर्षाच्या मुदतीच्या एक लाख ते पंचवीस लाख रुपये रकमेच्या भीशी चालविल्या आहेत. त्याच्याकडे बडे व्यावसायिक मोठी रक्‍कम भिशीमध्ये गुंतवणूक करीत असत. गुंतवणुकीचा हा आकडा कोट्यवधीचा होता. या साऱ्या गुंतवणूकदारांच्या हातावर तुरी ठेऊन त्याने धूम ठोकली. संपूर्ण परिवारानेच पोबारा केल्याने गुंतवणूकदार हताश झाले होते. सुमारे 50 कोटींची फसवणूक केली असल्याचा अंदाज आहे.

लॉकडाऊनपूर्वी भिशी उचलणाऱ्यांनी, लॉकडाऊन सुरु होताच भिशीचा हफ्ता वेळेवर देण्यास टाळाटाळ सुरु केल्याने व्यापाऱ्याचा बाजार उठण्यास सुरूवात झाली. ऑगस्ट महिन्यात व्यापाऱ्याच्या पत्नीला करोना झाल्याने पत्नीला उरुळी कांचन परिसरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले.

तेथून सारे कुटुंब पसार झाले. भिशीत पैसै अडकणाऱ्या केवळ 5 जणांनीसुरवातीला पोलिसांकडे धाव घेतली. भिशी व्यतिरिक्त फसवणूक नसल्याने फसवणूक झाल्याची तक्रार नोंदवली जात नसल्याने तोंड दाबून बुक्‍क्‍यांचा मार अशी अवस्था व्यापाऱ्यांची झाली. पूर्व हवेलीमधील पाचशेहून अधिक बड्या गुंतवणूकदारांकडून दोनशे कोटीहून अधिक रुपयांची माया गोळा केली होती.

उरुळी कांचन व परिसरात शेठ या टोपण नावाने फेमस असलेला भिशीचालक व्यापारी कुटुंबीयांसह महिनाभरापासून फरार होता. उरुळी कांचन गावातील काही गुंतवणूकदारांनी पुढे येऊन सप्टेंबर 2020 ला शेठच्या विरोधात लोणी काळभोर पोलिसांत लेखी स्वरुपात तक्रार दिली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.