पुणे :- फिट इंडिया चळवळीच्या माध्यमातून ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी व डेक्कन स्पोर्टस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे बर्गमॅन ट्रायथलॉन स्पर्धा येत्या 1 ऑक्टोबरला आयोजित करण्यात येणार आहे.
राज्य सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, एआयएसएसएमएसचे सचिव मालोजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत ही स्पर्धा सकाळी 6.30 वाजता संपन्न होईल. या स्पर्धेसाठी विविध देशांतील 500 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला असून त्यापैकी 100 महिला स्पर्धक आहेत. 1.9 किलोमीटर पोहणे, 90 किलोमीटर सायकल चालवणे व 21.1 किलोमीटर धावणे अशी या स्पर्धेची बांधणी केली असून स्पर्धकांपुढे नक्कीच एक मोठे आव्हान असणार आहे. डिंभे धरणाच्या फुलवडे गाव ते आडीवरे गाव व पुन्हा फुलवडेगाव असा स्पर्धेचा मार्ग निश्चित करण्यात आला आहे. 16 ते 30 वर्षे, 31 ते 40 वर्षे, 41 ते 50 वर्षे व 51 वर्षे ते पुढे या चार वयोगटांसाठी स्पर्धा असेल.
या स्पर्धेसाठी एकूण 150 स्वयंसेवक स्पर्धा मार्गावर कार्यरत असणार आहेत. आपत्कालीन परिस्थिती दरम्यास्पर्धा मार्गांवर सर्व सोयी सुविधांयुक्त सहा रुग्णवाहिका व वैद्यकीय पथके तैनात असणार आहेत. निसर्गरम्य डिंबे धरण परिसरामध्ये क्रिडा पर्यटनास चालना मिळावी या उद्देशाने स्पर्धा घेण्यात येणार आहे.
मालोजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा होणार आहे. विवेक वळसे पाटील, डेक्कन स्पोर्टस क्लबचे उदय पाटील, वैभव बेळगावकर, मंगेश गाडे, राजीव लिंग्रस, जयेश कदम, मनीष सूर्यवंशी, डॉ.समीर नागटिळक, समीर चौगुले, प्रशांत काटे, संतोष बोऱ्हाडे, दिलीप बोऱ्हाडे, गणेश बोऱ्हाडे, दिनेश खेडकर आदींनी स्पर्धेच्या आयोजनाचे नियोजन केले आहे.