पुणेस्थित आयटी व्यावसायिकाने दिव्यांग विदयार्थ्यांसाठी विकसित केले विनामूल्य सॉफ्टवेअर

पुणे : पुणेस्थित आयटी व्यावसायिक असलेल्या उदय मेहता यांनी आकलन अकार्यक्षमता असलेल्या मतिमंद , दृष्टिहीन विदयार्थ्यांकरिता विनामूल्य सोल्युशन विकसित केले आहे. या नवीन सोल्युशनद्वारे मुलांना आरएफआयडी इंटरफेसच्या  माध्यमातून रंजक पध्दतीने ज्ञान प्राप्त करण्याकरिता मदत होणार आहे. हा उपक्रम फक्त अभ्यासक्रमापुरता मर्यादित न ठेवता यामध्ये फिजिओथेरपी समाविष्ट करण्याचे उदय मेहता याचे उद्दीष्ट आहे.

उदय मेहता स्वतः एका 34 वर्षीय दिव्यांग मुलाचे वडील आहेत.  ते 18 वर्षे अमेरिकेत कार्यरत होते. या काळात त्यांनी वॉशिंग्टन डीसी येथे वर्ल्ड  बॅकसाठी काम केले होते. आपल्या मुलाकडे  लक्ष देण्यासाठी त्यांनी भारतात परत येण्याचा निर्णय घेतला. या क्षेत्रात तंत्रज्ञानयुक्त उपाययोजनांची तीव्र गरज लक्षात घेता त्यांनी हा उपक्रम सुरू केला.

2016 मध्ये उदय मेहता यांनी भूतान आणि पुणे येथील काही शाळांमध्ये या सोल्यूशनची पहिली आवृती कार्यान्वित केली. त्यानंतर वापरकर्त्याकडून मिळालेल्या प्रतिसादाच्या आधारावर आता याची दुसरी आवृती तयार आहे. या आवृतीमध्ये मराठी आणि गुजराती सारख्या प्रादेशिक भाषांचा देखील समावेश करण्यात आला आहे.

प्रायोगिक शिक्षण आणि मूल्यांकनावर आधारित कार्यक्रमांमध्ये सनकिड्स दिव्यांग किट, त्रिमितीय वस्तू (3डी ऑब्जेक्टस), आरएफआयडी रीडर आणि सनकिड्स दिव्यांग ऍप्लिकेशनचा वापर केला जातो. आरएफआयडी रीडर आणि टैग इटरफेसच्या आधारावर मुलांना वस्तू आणि छायाचित्रांचा वापर करून शिकता येते. दृष्टिहीन मुलांना मदत करण्यासाठी छायाचित्रे आणि ब्रेल अक्षरे आहेत. हाच मल्टीमिडिया आशय गुगल प्लेवर उपलब्ध असलेल्या इंटरऍक्टिव्ह मोबाईल ऍपद्वारे विदयार्थ्यांच्या पालकांना देखील दिला जातो.

याशिवाय प्रत्येक सत्रानंतर विद्याथ्यांच्या प्रगतीबाबत सखोल विश्लेषण प्राप्त होऊ शकते .त्यामध्ये विविध प्रकारचे आवाज, रंग, आकार, प्राणी इत्यादीमधील फरक कळण्याची क्षमता याचा समावेश आहे.  डेटा अनॅलिटीक्स किंवा विश्लेषण वय, बुष्टिमत्तेची पातळी (आयक्यू लेव्हल) कोणता विकार आहे, शारीरिक विकाराची पातळी अशा अनेक गोष्टींवर प्रत्येक विदयार्थ्यासाठी वेगळे असते.

सोल्युशनची दूसरी आवृती पुणेस्थित सामाजिक संस्था असलेल्या अभिसार फाउंडेशच्या  मदतीने कार्यान्वित करण्यासाठी सुरुवात केली आहे. सध्या सातारा येथील आशा भवन है शारीरिक व मानसिकदृष्ट्या अपंग असलेल्या विदयार्थ्यांसाठी कार्यरत असलेले अनाथ आश्रम येथे कार्यान्वित करण्यात आले आहे. येथे 50 विद्यार्थी आहेत. याशिवाय हे सोल्युशन निगडी येथील कामायनी शाळेत देखील प्रस्थापित केले असून तेथे लवकरच याचा वापर सुरू होईल.

या सोल्यूशनमधील युजर इंटरफेस हा अगदी सोपा आणि सुलभ असून केवळ 4 तासांत याचे प्रशिक्षण शिक्षकांना दिले जाऊ शकते. याशिवाय ऑनलाईन स्क्रीन शेअरींग अॅप्लिकेशनद्वारे ऑनलाईन सपोर्ट देखील देतो.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.