पुणे – बापटांना 960, तर जोशींना 337 पोस्टल मते

पुणे – भाजपचे विजयी उमेदवार गिरीश बापट यांना 960 मते पडली, तर कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांना 337 मते पडली.

पोस्टल मते मिळून बापट यांना 6 लाख 32 हजार 835 मते पडली. तर जोशी यांना तीन लाख आठ हजार 207 मते पडली. अंतीम आकडेवारीनुसार बापटांनी तीन लाख 34 हजार 628 मतांची आघाडी घेतली आणि जोशी यांचा पराभव केला.

या निवडणुकीत तिसऱ्या स्थानावर राहिलेल्या वंचित आघाडीला पोस्टल मध्येही 59 मते पडली. वंचित आघाडीचे अनिल जाधव यांना अंतिमत: 64 हजार 793 मते पडली. याबाबतची अधिकृत माहिती शुक्रवारी मध्यरात्री जाहीर करण्यात आली.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.