पुणे – जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी 3 लाख रुपये लाचेची मागणी करून 1 लाख 90 हजार स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केलेल्या उपायुक्त तथा जिल्हा जात पडताळणी समिती प्रमाणपत्र समितीचे सदस्य नितीन चंद्रकांत ढगे (वय 40) यांना सत्र न्यायाधीश एस.बी.हेडाऊ यांनी जामीन मंजुर केला.
ढगे यांनी ऍड. सुधीर शहा, ऍड. जितेंद्र सावंत आणि ऍड. राहुल भरेकर यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला. 32 वर्षीय तक्रारदाराने दिलेल्या फिर्यादीनुसार 17 ऑक्टोबर रोजी ही कारवाई केली. कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर नऊ महिन्याचा कालावधी उलटला. तरीही जात प्रमाणपत्र देण्यात आले नाही.
सप्टेंबर 2021 तक्रारदाराने 5 लाख रुपये दिले. तरीही त्यांचे काम झाले नाही. त्यानंतर तक्रारदार प्रत्यक्ष ढगे यांना भेटले. त्यांनी तीन लाखाची मागणी केली. तडजोडीअंती 1 लाख 90 हजार रुपये देताना ही कारवाई करण्यात आली.
दरम्यान पोलिसांनी केलेल्या कारवाईत 1 कोटी 28 लाख रुपयांचे घबाड ढगे यांच्याकडे मिळून आले. दरम्यान न्यायालयीन कोठडीत असताना ऍड. सुधीर शहा, ऍड. जितेंद्र सावंत आणि ऍड. राहुल भरेकर यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज करण्यात आला.