Pune | उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्या 10 जणांना जामीन

पुणे, दि. १६ – विनापरवानागी करोनाच्या परिस्थितीत आंदोलन करीत पोलिसांशी झटापट करणाऱ्या आझाद समाज पार्टीच्या दहा जणांना न्यायालयाने १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अंतरिम जामीन मंजूर केला.

भीमराव दत्तु कांबळे (वय ३१), अभिजित मधुकर गायकवाड (वय ३२, रा. घोरपडी), रफिक रुस्तुम शेख (वय ३७, रा. लोहगाव), अंकित परशुराम गायकवाड (वय २१, रा. मार्केटयार्ड), दर्शन बाबूराव उबाळे (वय २५, रा. येरवडा), दत्ता मोहन भालशंकर (वय ३८, रा. येरवडा), विनोद लक्ष्मण वाघमारे (वय ३४, रा. घोरपडी), महेश वैजनाथ थोरात (वय २१, रा. मार्केटयार्ड), सागर वीरभद्र जवर्इ (वय २३) आणि शरद गौतम लोखंडे (वय २३, दोघेही रा. घोरपडी) अशी त्या दहा जणांची नावे आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक बसवराज माळी यांनी फिर्याद दिली आहे.

आरोपींनी सोमवारी (ता. १०) दुपारी बाराच्या सुमारास भोसलेनगर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केले. या आंदोलनासाठी त्यांना पोलिसांकडून परवानगी घेतली नव्हती. तसेच आंदोलन करताना कोरोना विषयक खबरदारी घेण्यात आली नाही. तसेच आरोपींना ताब्यात घेतल्यानं पोलिसांशी झटापट केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

न्यायालयीन कोठडीत असताना बचाव पक्षाच्या वतीने अ‍ॅड. तोसिफ शेख,अ‍ॅड. मोहन वाडेकर, अ‍ॅड. क्रांती सहाणे, अ‍ॅड.दिपक गायकवाड,अ‍ॅड. सुरज जाधव,अ‍ॅड. जयदीप डोके, अ‍ॅड स्वप्नील गिरमे,अ‍ॅड. रवी वाघमारे यांनी जामिनासाठी अर्ज केला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.