चिमुकलीला अज्ञाताने सोडून केला पोबारा; पोलिसांनी दिले जीवदान

येरवडा – पाच महिन्याच्या चिमुकलीला दर्ग्याच्या परिसरात अज्ञात इसमाने सोडून पोबारा केला. ही घटना खराडी नगररोड येथील जनक पीर बाबा दर्गा येथे सोमवारी सायंकाळी घडली.

पाच महिन्यांच्या मुलीला जनक पीर बाबा दर्गा येथे सोडल्याची माहिती नागरिकांनी पोलिसांना कळाली. चंदननगर पोलिसांना या गंभीर घटनेची माहिती मिळताच पोलीस शिपाई पांडुरंग नाणेकर, संदीप पाटील आणि दामिनी पथकाच्या पोलीस कर्मचारी उज्वला बनकर आणि सुवर्णा वाळके यांनी या ठिकाणी तात्काळ धाव घेऊन बाळास ताब्यात घेतले.

चंदननगर पोलीस स्टेशन येथे आणून त्याची व्यवस्थित काळजी घेतली. बाळाची प्रकृती व्यवस्थित असून बाळाला सोडून जाणाऱ्या व्यक्तीचा शोध पोलीस घेत आहे. सदर बाळाबद्दलची माहिती कोणाला असल्यास चंदननगर पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.