पुणे – करोनानंतर तब्ल पावणेदोन वर्षांनी शाळा सुरू करण्यावर शासनाकडून शिक्कामोर्त करण्यात आले आहे. यामुळे आता शाळांची लगबग सुरू झालेली असून शासनाच्या मार्गदर्शक सूचनांची प्रतिक्षा लागली आहे. विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी शाळांकडून तयारी करण्यात येत आहे.
शाळांत स्वच्छता, सॅनिटायझेन करण्याचे नियोजन करुन त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. मुलांना शाळेत पाठविण्याबाबत पालकांचे संमतीपत्र मिळावे यासाठी पालकांच्या ऑनलाइन, ऑफलाइन बैठकाही घेण्यात येणार आहे. त्यामुळे पहिल्याच दिवशी सर्वच शाळा प्रत्यक्ष सुरू होतील याबाबत शाळांच्या मुख्याध्यापकांकडून साशंकता व्यक्त करण्यात येऊ लागली आहे.
दरम्यान काही शाळांनी विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प, चॉललेट, पेढे वाटप करून स्वागत करण्याची तयारी सुरू ठेवली आहे.