पुणे : आज कसबा मतदार संघाच्या वतीने पेशवे पार्क महावितरण ऑफिस सदाशिव पेठ येथे करण्यात आले. महावितरणाने 75 लाख वीज ग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवून महाराष्ट्रातील 4 कोटी जनतेला अंधारात टाकण्याचे पाप करणा-या महावितरणाच्या निषेधार्थ महाराष्ट्रभर आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, तसेच महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्व जिल्ह्यांमध्ये आंदोलन करायला सांगितले.
त्याचाच एक भाग म्हणून आज कसबा मतदार संघामध्ये खासदार गिरीश बापट, आमदार मुक्ता टिळक, यांच्या मार्गदर्शनाने शुक्रवार दि. ५ फेब्रुवारी, सकाळी १० वाजताकसबा मतदार संघाचे अध्यक्ष प्रमोद कोंढरे यांच्या नेतृत्वाखाली सदाशिव पेठ पेशवे पार्क, महावितरण केंद्रांवर “टाळा ठोको व हल्लाबोल”आंदोलन आयोजित केले आहे.
कसबा मतदार संघाचे सरचिटणीस छगन भुलाखे, राजेंद्र काकडे राणी कांबळे, महिला अध्यक्ष अश्विनी पांडे, युवा मोर्चा अध्यक्ष अमित कंक,,प्रचार प्रासिद्धी प्रमुख पुष्कर तुळजापूरकर कसबा मतदार संघाचे उपाध्यक्ष उमेश आण्णा चव्हाण, विजय गायकवाड, प्रतिभाताई ढमाले, भारत जाधव, शैलेश बढाई, सचिन सोळंकी चिटणीस कसबा हर्षल रोटे, अमोल शुकल, निलेश वैराट, विजय कोठावळे, पुणे शहर उपाध्यक्ष धनंजय जाधव, शहर चिटणीस सुनील माने, कसबा हजारी भाग प्रमुख सागर खरात, पुणे शहर युवा मोर्चा सरचिटणीस राजु परदेशी ,सुनील मिश्रा, पुणे शहर युवा कोषाध्यक्ष संतोष फडतरे, युवा मोर्चा सरचिटणीस प्रणव गंजीवाले केदार मानकर, प्रभाग अध्यक्ष किरण जगदाळे, अर्जुन खानापुरे, उमेश दूरडें, रमेश जगताप, सागर शिंदे, महिला सरचिटणीस आरती तांबे, सर्व कार्यकर्ते पदाधिकारी स्वीकृत नगरसेवक उपस्थित होते.