पुणे : चोरीच्या गुन्ह्यात फरार सराईतास अटक

पुणे – जबरी चोरीच्या गुन्ह्यात महिन्यापासून फरार असलेला सराईताला स्वारगेट पोलिसांनी अटक केली. तो गुलटेकडी येथील मीनाताई ठाकरे वसाहतीमध्ये आला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार पोलीस अंमलदार ज्ञाना बडे व मनोज भोकरे हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना खबर मिळाली की एक महिन्या पासून पाहिजे असलेला आरोपी अदनान कुरेशी (रा गुलटेकडी पुणे) हा मीनाताईठाकरे वसाहत गुलटेकडी या ठिकाणी आला आहे. त्यानुसार त्यास ताब्यात घेवुन दाखल गुन्ह्याबाबत अधिक चौकशी करता त्याने गुन्हयाची कबुली दिली आहे. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक तुषार भोसले करत आहेत.

ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब कोपनर व पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ ,पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले ,तुषार भोसले पोलिस अंमलदार कुंभार,धावरे ,शेख खेदांड,दळवी,तितमे,बडे,भोकरे,गोडसे साळवे,वाबळे,सरक खोमणे यांच्या पथकाने कामगीरी केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.