पुणे : स्वारगेट परिसरात युवकावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या GST टोळी प्रमुखास व दोन साथीदारांस स्वारगेट पोलिसांनी केले जेरबंद केले.
स्वारगेट हद्दीमध्ये डायस्प्लॉट भागात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने युवकावर प्राणघातक हल्ला केल्याने स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दाखल गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरिक्षख अमोल रसाळ व तपास पथकातील स्टाफसह करत असताना पोलिस शिपाई ज्ञाना बडे व मनोज भोकरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून दाखल गुन्ह्यातील मुख्य आरोपी गोविंदसिंग टाक (रा – डायस्प्लॉट गुलटेकडी ), राहुल उर्फ लल्लन कांबळे (रा – मंगळवारपेठ ), गणेश तुपे (रा मंगळवारपेठ पुणे) यांस ताब्यात घेऊन त्यांच्याकडे अधिक चौकशी करता त्यांनी दाखल गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यांस अटक करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी हि वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब कोपनर, पोलीस निरीक्षक(गुन्हे) सोमनाथ जाधव स्वारगेट पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली व सुचनेनूसार स्वारगेट पोलीस स्टेशन तपास पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक अमोल रसाळ , पोलीस अंमलदार कुंभार,दळवी,साळवे,कांबळे, शेख ,खेंदांड,ढावरे,तिटमे,यांच्या पथकाने कामगीरी केली आहे.