पुणे: काश्‍मीरमध्ये सैन्याला 30 “ऑक्‍सिजन कॉन्सन्ट्रेटर्स’

पुनीत बालन यांच्या इंद्राणी बालन फाऊंडेशनचा उपक्रम

पुणे – या वर्षीच्या सुरुवातीपासून पुनीत बालन यांनी काश्‍मीरमध्ये सैन्य दलाच्या विविध सामाजिक उपक्रमांमध्ये आपल्या “इंद्राणी बालन फाऊंडेशन’च्या माध्यमातून सक्रीय सहभाग घेण्यास सुरुवात केली आहे.

फाउंडेशनने काश्‍मीर खोऱ्यातील उरी, त्रेघगाम, वेन, हाजीनार आणि बारामुल्ला येथील विशेष मुलांसाठी असलेल्या 5 “गुडविल स्कूल्स’ना मदत करण्यासाठी सैन्य दलाच्या “चिनार कॉर्प्स विभागासोबत करार केला आहे. फाउंडेशनच्या “नेशन फर्स्ट’ या उपक्रमांतर्गत हे मदतकार्य सुरू आहे.

भारतीय सैन्य दल आणि इंद्राणी बालन फाऊंडेशन यांच्यातील मैत्रीपूर्ण नात्यातून फाऊंडेशनतर्फे वेळोवेळी काश्‍मीरमधील समाजोन्नतीसाठी मदतीचा हात पुढे केला जातो. कोविड काळात पुनीत बालन यांनी बारामुल्ला येथील सैन्य दलाच्या कोविड हॉस्पिटलला 15, श्रीनगर येथे चिनार कॉर्प्सला 10 आणि सैन्य दलातील इतर विभाग आणि काश्‍मीर विमानतळावरील सेन्ट्रल आर्म्ड पोलीस फोर्स यांना मिळून 5 असे एकूण 30 ऑक्‍सिजन कॉन्सन्ट्रेटर्सची सामाजिक मदत म्हणून दिले आहेत. या उपक्रमाची दखल घेऊन, कोअर कमांडर लेफ्ट. जन. डी. पी. पांडे यांनी बालन यांचे आभार मानले.

पुनीत बालन हे एक समाजभान असणारे तरुण उद्योजक असून निरनिराळ्या सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रीय सहभागी असतात. 2020 पासून कोविड साथरोग काळात बालन पुण्यामध्ये समाजातील विविध स्तरांवर वेगवेळ्या स्वरुपाची खूप मोठी मदत करत आले आहेत.

महाराष्ट्रात सुरू असलेल्या मदतकार्याचा पुढचा टप्पा म्हणून काश्‍मीर खोऱ्यातील करोना साथीच्या पार्श्‍वभूमीवर “इंद्राणी बालन फाऊंडेशन’तर्फे 30 ऑक्‍सिजन कॉन्सन्ट्रेटर्स देण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त सैन्य दलास काश्‍मिरी आवामसाठी जी वैद्यकीय मदत लागेल, ती आमच्या संपूर्ण क्षमतेने करण्यासाठी एक जबाबदार नागरिक म्हणून मी कटिबद्ध आहे.
– पुनीत बालन, युवा उद्योजक

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.