पुणे -शहरात गेल्या चोवीस तासांत 3 हजार 978 नव्या करोना बाधितांची वाढ झाली असून, बरे झालेल्या 4 हजार 936 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र, बाधित मृतांचा आकडा वाढतच असून, गेल्या चोवीस तासांत शहर हद्दीतील 58 जणांसह 85 जणांचा मृत्यू झाला आहे. एका दिवसांतील मृतांची ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे.
शहरातील ऍक्टिव्ह बाधितांची संख्या 44 हजार 59 पर्यंत कमी झाली आहे. यापैकी 6 हजार 718 रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. तर 1 हजार 379 रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. आतापर्यंत शहरात 4 लाख 10 हजार 504 जण बाधित झाले असून, त्यापैकी3 लाग 59 हजार 776 रुग्ण बरेही झाले आहेत. मात्र, 6 हजार 669 जणांचा मृत्यू झाला आहे.
गेल्या चोवीस तासांत 20 हजार 277 संशयितांची स्वॅब टेस्ट करण्यात आली असून, मागील आठवड्याच्या तुलनेत रुग्णसंख्या वाढीचा दर कमी होऊन तो 20 टक्क्यांपर्यंत आला आहे.