पुणे : शहरात करोनाचे आणखी 171 बाधित आढळले

पुणे – शहरात शनिवारी करोनाचे 171 नवे बाधित सापडले. तर 7 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. त्यामध्ये शहर हद्दीत 4 तर शहराबाहेरील 3 जणांचा समावेश आहे.

शहरात दिवसभरात 8 हजार 285 संशयितांची नमुने तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 171 बाधितांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. आजचा बाधित दर 2.06 टक्के इतका आहे.

मागील दहा दिवसांपासून शहरातील बाधित संख्या दीडशे ते दोनशेच्या आत असल्यामुळे सक्रिय बाधित संख्येतही काहीप्रमाणात घट झाली आहे.

सध्या 1,552 पैकी 185 बाधितांची प्रकृती चिंताजनक आहे. तर 237 बाधितांना ऑक्‍सिजन लावण्यात आला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.